1998 नंतर प्रथमच वडशिवणे तलाव ओसंडून वाहतोय – नागरिकांची पाण्यातून वाटचाल…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : वडशिवणे (ता.करमाळा) येथील करमाळा तालुक्यातील सर्वात मोठा तलाव मानला जातो, या तळ्याची पाणी सामावून घेण्याची क्षमता मांगी येथील तलावानंतर सर्वात मोठी मानली जाते, परंतु या तळ्यात दरवर्षी पावसाळ्यात त्या तुलनेने पाणी येत नाही व तलाव पूर्ण क्षमतेने भरत नाही. परंतु 1998 नंतर प्रथमच वडशिवणे येथील तलावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक झालेली आहे.
1998 नंतर प्रथमच या तलावाचा सांडवा ओसंडून वाहत आहे हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी वडशिवने गावातील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर केम, कंदर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येत आहेत. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात काळजी घेत आपला प्रवास करावा असे वडशिवणेचे सरपंच विशाल जगदाळे यांनी आवाहन केले आहे.