हनुमान चालीसा वर्धापन दिनानिमित्त केममध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज…

संग्रहित छायाचित्र

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम सुरू आहे. दर शनिवारी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात येते. त्यानंतर श्री हनुमानाची आरती व महाप्रसादाचे वाटप केले जाते.

या उपक्रमाला परिसरातील सुमारे १५० ते २०० तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. येत्या १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हनुमान चालीसा पठणाचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.  यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री हनुमानास अभिषेक करण्यात येणार असून, सायंकाळी ७ ते ८ या वेळेत ह.भ.प. बालाजी बोराडे महाराज (झी टॉकीज फेम) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

कीर्तनानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण, आरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास उत्तरेश्वर देवस्थानचे महंत जयंतगिरी महाराज , हनुमान देवस्थान गोशाळा अकुलगावचे प्रमुख रामकृष्ण महाराज व संतोष वाळुंजकर महाराज आदी जणांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सकल हिंदू समाज, बजरंग दल व भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!