करमाळा बायपास रोडवर ठिकठिकाणी खड्डे – दुरुस्तीची मागणी
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : करमाळा येथील बायपास रोडवर ठीकठिकाणी मोठं मोठे खड्डे झालेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या जिकरीने वाहन चालवावे लागत आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने वाहत असतात ज्यामध्ये ट्रक, बसेस,कार, जीप, दुचाकी, अवजड वाहने प्रवास करतात. त्यामुळे बायपास रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी करमाळा येथील नागरिकांनी केली आहे.
या बायपास रोडवर जामखेड चौकाच्या थोडे अलीकडे नेहमी फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. त्याचप्रमाणे करमाळा बायपास हा जेऊर रोडवरूनच्या बाजून जिथे सुरू होतो (पाणीपुरवठा ऑफिस ) तिथे चढाला देखील नेहमीच खड्डे होतात. अवजड वाहनांना तर इथून मोठ्या जिकरीने गाडी काढावी लागते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याला नेहमी केली जाणारी मलमपट्टी ही फार हलक्या दर्जाची असते. एका महिन्याच्या आत रस्ता पुन्हा जैसे थे होतो.यामुळे उत्कृष्ट दर्जाची दुरुस्ती करावी अशी मागणी करमाळा येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.