वयाचे शतक पार केलेले जगन्नाथ पाखरे यांचे निधन - Saptahik Sandesh

वयाचे शतक पार केलेले जगन्नाथ पाखरे यांचे निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : उमरड (ता. करमाळा) येथील जगन्नाथ राजाराम पाखरे (वय १०५) यांचे आज (ता. ८) वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांचे मागे चार मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचेवर उमरड येथे त्यांचे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष वामनराव बदे, सरपंच पडवळे, माजी सरपंच हनुमंत चौधरी, साहेबराव मारकड, संदीप मारकड, हनुमंत चौधरी, मुख्याध्यापक संपतराव कोठावळे यांचेसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते. उमरड व परिसरात १०५ वर्षे आयुष्य जगणारे एकमेव व्यक्तीमत्व असल्याचे बोलले जाते. सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर पाखरे, शेतकरी आजिनाथ पाखरे, बिभिषण पाखरे, विलास पाखरे यांचे ते वडील होते. यावेळी मुख्याध्यापक फोजमल पाखरे यांनी श्रध्दांजलीपर विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!