करमाळा शहरातील कुटीर रूग्णालय ते विश्रामगृहापर्यंतच्या रस्त्यासाठी 20 लाख रूपये मंजूर – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता 8) :
शहरातील कुटीर रूग्णालय ते विश्रामगृहापर्यंतचा सतत रहदारीतचा व अत्यंत खराब झालेल्या रस्त्यासाठी 20 लाख रूपये तातडीने मंजूर केले आहेत, अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

कुटीर रूग्णालयात ते जिल्हापरिषद विश्रामगृहापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, टेलिफोन ऑफिस, न्यायालय, याच रस्त्यावरून तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस कार्यालय, आदी कार्यालयात जावे लागते.

सध्या ऊस वाहतूक व अन्य जड वाहने हे सुध्दा याच रस्त्यावरून जातात, त्यामुळे हा रस्ता दुरूस्त होणे गरजेचे होते. आमदार संजयमामा शिंदे यांनी जिल्हा विकास निधीतून 20 लाख रूपये तातडीने मंजूर केले असून, हे काम लवकरच पूर्ण करू असे आमदार शिंदे यांनी सांगितले आहे.करमाळा वकील संघाकडून आ.शिंदे यांचा सन्मान…

करमाळा शहरातील कुटीर रूग्णालय ते विश्रामगृहापर्यंतचा सतत रहदारीतचा व अत्यंत खराब झालेल्या रस्त्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी तातडीने 20 लाख रूपये मंजूर केले असल्याने करमाळा वकील संघाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.जरांडे, जेष्ठ विधीज्ञ ॲड.डॉ.बाबुराव हिरडे, ॲड.आजिनाथ शिंदे, ॲड.एम.डि.कांबळे,ॲड.जयदीप देवकर, ॲड.विनोद चौधरी, ॲड.योगेश शिंपी, ॲड.नवनाथ राखुंडे, ॲड.राहुल सावंत, ॲड.पी.के.पवार, ॲड.अविनाश पवार, ॲड.बालाजी पिंपरे, ॲड.सचिन हिरडे, ॲड.पठाण आदीजण उपस्थित होते. याप्रसंगी वकील संघाने करमाळा न्यायालयात सिनियर डिव्हिजन सुरू करण्यासाठी नवीन इमारतीसाठी प्रस्ताव दिलेला आहे, असे सांगितल्यानंतर आमदार शिंदे यांनी याबाबत चौकशी करून ते काम लवकरच मार्गी लावतो असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!