चिखलठाण मंदिरा जवळील दहावे करण्यावर शासनाने कडक निर्बंध घालावेत - Saptahik Sandesh

चिखलठाण मंदिरा जवळील दहावे करण्यावर शासनाने कडक निर्बंध घालावेत

समस्या – करमाळा तालुक्यातील चिखलठाण क्रमांक 1 येथे उजनीच्या काठावर कोटलींगाचे प्रसिद्ध मंदिर असून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. विविध ठिकाणाहून अनेक लोक इथे दहावे करण्यासाठी देखील येतात. या दहाव्याच्या कार्यक्रमामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक कार्यक्रम झाला की तसेच निघून जातात. तयार झालेल्या कचऱ्याची कुणी दखल घेत नाही. इथे एका दिवसात ४ ते ५ दहावे केले जातात. त्यामुळे हा परिसर दिवसेंदिवस अस्वच्छ होत चालला आहे. परिसराबरोबर येथील उजनीचे पाणी देखील प्रदूषित होत आहे.
त्यामुळे दहावे करण्यासाठी शासनाने एकतर इथे बंदी घातली पाहिजे अथवा ज्या प्रमाणे इतर धार्मिक ठिकाणी कोणत्याही विधी करताना काटेकोरपणे नियम आखून दिले जातात तसेच या ठिकाणी देखील शासनाने कडक नियम लागू करावे व या नियमांची अंमल बजावणी करून घेणारी यंत्रणा हवी जेणे करून या पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी स्वच्छता राहील.

समस्या मांडणारे – रुपेश पवार, चिखलठाण क्र.१

समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून– ग्रामपंचायत, शासन

तुमच्या परिसरातील अडचणीवर आवाज उठविण्यासाठी संदेश सिटीझन रिपोर्टर वर रिपोर्ट कराhttps://saptahik-sandesh.com/sandesh-citizen-reporter-page/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!