श्रीकृष्ण येवले यांची एम.पी.एस.सी.परिक्षेत उपनिरीक्षकपदी निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सालसे (ता.करमाळा) येथील युवक श्रीकृष्ण आप्पासाहेब येवले यांची 2022 ला झालेल्या एम.पी.एस.सी.परिक्षेत ऊपनिरीक्षक पदावर निवड झाली.

श्रीकृष्ण येवले हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सालसे,माध्यमिक शिक्षण लाल बहादूर शास्त्री विद्यालय सालसे, ऊच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी कॉलेज बार्शी तर पदवी चे शिक्षण मुक्त विद्यापीठातून पूर्ण झाले . 2016 पासून नवी मुंबई येथे पोलिस खात्यात कार्यरत असणाऱ्या श्रीकृष्णाने प्रामाणिक पणे सेवा बजावत अभ्यास करून हे यश संपादन केले आहे .

श्रीकृष्णाची यशाची बातमी ऐकून सालसे गाव व परिसरातील लोकांनी आणि येवले परिवारातील लोकांनी आनंद ऊत्सव साजरा केला . त्यांच्या या यशाचे ग्रामपंचायत माजी सदस्य राजाराम येवले , माजी उपसरपंच भिमराव येवले व भाऊसाहेब येवले यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!