'झांगडू' मराठी चित्रपटात करमाळा शहरातील माधुरी परदेशी आईच्या भुमिकेत.. - Saptahik Sandesh

‘झांगडू’ मराठी चित्रपटात करमाळा शहरातील माधुरी परदेशी आईच्या भुमिकेत..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा भुमीने नागराज मंजुळे सारखे दिग्दर्शक घडवले आहे. त्यांच्या लेखणी आणि दिग्दर्शनाने आख्या भारताला भूरळ पाडली आहे. त्याच करमाळा मातीतील प्रतिभावंत लेखक रंगनाथ आव्हाड यांनी ‘झांगडू’ नामक कथेची मांडणी केली आणि त्याला मृर्तस्वरूप आपल्या दिग्दर्शन आणि संकलनातून राहूरीतील शेतकरी कुटूंबातील देवा वाघ व निर्मितीचे सुत्रे योगेश ढोकणे या प्रगतशील शेतकऱ्याने पेलले आहे. तसेच चित्रपटाला साजेशे संवाद रणजित लहारे यांनी आपल्या लेखणीतून लिहिले आहेत.

या चित्रपटात करमाळा येथील प्रसिध्द कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र परदेशी यांच्या अर्धागिणी माधुरी परदेशी यांनी नायिकेच्या आईची भुमिका केली आहे. माधुरी परदेशी यांची अभिनयाची आवड लक्षात घेता त्यांचे पती राजेंद्र परदेशी यांनी त्यांना या चित्रपटात अभिनय करण्यास प्रोत्साहीत केले. माधुरी परदेशी यांचा पहिलाच चित्रपट असून त्यांनी त्याचे सोने करत आईच्या भुमिकेला अक्षरश:

जिवंत केले आहे. आपल्या संस्कृतीतील आईचा आदर्श समाजासमोर आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी आधुनिक जगाला पटवून दिले आहे. या चित्रपटात करमाळ्यातील अनुप कांबळे, सचिन ननवरे, अनिल गवळी, गजराज कांबळे व यशवंत कांबळे यांनी भुमिका केल्या आहेत. एक वेगळी प्रेमकथा व ग्रामीण भागातील राजकारण कॉमेडीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘झांगडू’ चित्रपटातील त्यांची भुमिका प्रेक्षकांना पाहण्याचा योग येत आहे, सदर चित्रपट इंदापूर, बार्शी आणि हडपसर (पुणे) येथील वैभव चित्रपटगृहात २ डिसेंबरला प्रसिध्द झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!