सोलापूर येथे जिल्हास्तरीय ज्युडो कुस्ती स्पर्धेत भाळवणी येथील पै.अनुष्का शिंदे व पै.प्रसाद जाधव यांना सुवर्णपदक..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्युडो कुस्ती स्पर्धेत ऑलिम्पिकवीर पै.खाशाबा दादासाहेब जाधव तालीम भाळवणी (ता.करमाळा) येथील 14 वर्षाखालील ज्युडो कुस्ती स्पर्धेत 32 किलो वजनी गटामध्ये पै. अनुष्का महेंद्र शिंदे हिने सुवर्णपदक पटकवले आहे तर 30 किलो वजन गटात पै. प्रसाद पांडुरंग जाधव याने सुवर्णपदक पटकवले आहे.
या खेळाडूंची पुढील स्पर्धेसाठी पुणे येथे विभागीय ज्यूडो कुस्तीसाठी निवड झाली आहे. त्यांना मुंबई येथील महापौर केसरी पै.विजय दादा गुटाळ गुरुवर्य पै. नवनाथ खरात व वस्ताद पै. योगेश शेवाळे यांचे मार्गदर्शन भेटले आहे. राष्ट्रीय विजेते पै. नारायण आबा पाटील ,नायब तहसीलदार प्रशांत खताळ, डबल उपमहाराष्ट्र केसरी पै. अतुल भाऊ पाटील ,महाराष्ट्र केसरी पै चंद्रहास बापू निमगिरे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. राजेंद्र गायकवाड ,कंदरचे वस्ताद पै उमेश काका इंगळे ,कविटगावचे सरपंच पै. शिवाजी काका सरडे , ढवळसचे चे वस्ताद पै लक्ष्मण आबा शिंदे व भाळवणी ग्रामपंचायत आदी जणांनी शुभेच्छा दिल्या आहेत.