उद्याच्या करमाळा बंदला केम व्यापारी असोसिएशनचा पाठिंबा
केम ( प्रतिनिधी/संजय जाधव) : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व इतर महा पुरुषांबद्दल सातत्याने अपशब्द वापरणाऱ्या लोकांच्या निषेधार्थ उद्या दिनांक 7 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने करमाळा तालुका बंदची हाक दिली आहे, याला प्रतिसाद म्हणून केम व्यापारी असोसिएशन व शिवप्रेमी ग्रामस्थ यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.
उद्या केम येथे कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विटंबना छत्रपती शिवाजी महाराज यांची नसून सर्वच महापुरुषांची झाली आहे, तरी या घटनेच्या निषेधार्थ उद्याच्या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केम शहर शिवप्रेमी , व्यापारी असोसिएशन ग्रामस्थ यांनी केले आहे.