उद्या ७ डिसेंबरला 'करमाळा बंद' - सर्व संघटनांचा 'बंद'ला पाठिंबा.. - Saptahik Sandesh

उद्या ७ डिसेंबरला ‘करमाळा बंद’ – सर्व संघटनांचा ‘बंद’ला पाठिंबा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोषारी व इतिहासाचे विकृतीकरण व जाणीवपूर्वक अपशब्द वापरुन समस्त शिवप्रेमी अनुयायांची भावना दुखावल्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व शिवप्रेमी, शिवभक्त बांधव तसेच करमाळा शहर व तालुक्यातील व्यापारी, विविध संघटनांनी घेतला आहे.

सध्या राज्यासह देशभरात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपुऱ्या ज्ञानातून अथवा कलुषित मनोवृत्तीतून अपमानकारक वक्तव्य केली जात आहेत. अशा भाषेत तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत, करमाळा शहरातील या बंद साठी सर्व व्यापारी वर्ग तसेच विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

या ‘बंद’ निमित्ताने करमाळा शहरातील “छत्रपती चौक” भवानी पेठ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सकाळी १० वाजता दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!