कृषी विभागकडून उमरड येथे ‘महिला शेतीशाळा’चे आयोजन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथे महिला शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते, सदर शेतीशाळा वर्गामध्ये मका उत्पादक महिला शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे व राजेंद्र बनसोडे यांनी एकतमिक कीड व्यवस्थपन, खत चा संतुलित वापर, ऊस पाचट व्यवस्थपन या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमसाठी उमरड गावचे सरपंच लालासाहेब पडवळे, प्रमोद बदे व शेतकरी बांधव महिला शेतकरी मोठ्या सख्या ने उपस्थित होते. या कार्यक्रमचे सूत्र संचालन कृषी सहाय्यक प्रतीक सरडे यांनी तर आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक महेश राजून यांनी केले. शेतीशाळा आयोजनासाठी बाळू घनवट व अण्णा पडवळे यांनी विशेष परिश्रम घेतले.