केतुर नं 2 येथील दत्त मंदिरात पाच दिवसीय ‘योग शिबिर’ उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पतंजली योग समिती करमाळा, पतंजली योग समिती इंदापूर आणि केतुर नं 2 (ता.करमाळा) येथील ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने केतुर नं 2 येथील दत्त मंदिर येथे पाच दिवसीय योग शिबिर घेण्यात आले.
कै.धोडपंत दादा यांच्या कृपाशीर्वादाने चालू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 36 वे, तिसरा तपपुरती सोहळा निमित्ताने योग शिबिर घेण्यात आले. या योग शिबिराची सांगता औषधीय यज्ञ करून योग प्राणायाम शिबिराची सांगता करण्यात आली.
यावेळी नियमित योग वर्ग सुरू ठेवण्यासाठी ग्राम समितीची स्थापना करण्यात आली. करमाळा स्वाभिमान तालुका प्रभारी हनुमानसिंग परदेशी, पतंजली योग इंदापूर तालुका प्रभारी मल्हारी घाडगे, किसान प्रभारी चंद्रकांत देवकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
या सांगता कार्यक्रमासाठी करमाळा तालुका कोषाध्यक्ष दीपक कटारिया, पतंजली योग करमाळा तालुका प्रभारी बाळासाहेब नरारे, करमाळा तालुका किसान प्रभारी रामचंद्र कदम, युवा प्रभारी प्रवीण देवी इत्यादी प्रमुख उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विवेक निचळ, ज्ञानदेव जाधव, महेश येवले, बाळासाहेब महानवर, रावसाहेब जरांडे, विठ्ठल राऊत इत्यादींनी परिश्रम घेतले.