झरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.. - Saptahik Sandesh

झरे विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालय झरे (ता.करमाळा) येथे एस. एस. सी परिक्षा २०२२ मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

प्रथम क्रमांक कु.भारती नारायण मोरे, द्वितीय क्रमांक कु. शिवाणी संतोष शिंदे, तृतीय क्रमांक कु.राजनंदिनी रामभाऊ घाडगे, या विद्यार्थ्यांना यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेश भाऊ करे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सुवर्णपदक, व अनुक्रमे ३०००,२०००,व १००० रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना श्री.करे पाटील यांनी उत्कृष्ट प्रबोधन केले . हा उपक्रम दर वर्षी चालु राहणार असल्याचे सांगत त्यांनी इतरांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!