करमाळ्यात ९ डिसेंबरला मोफत सर्वरोग निदान, शस्त्रक्रिया आणि मोफत ॲन्जीओग्राफी शिबीर..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : जगताप गटाचे नेते व माजी आमदार जयवंतराव जगताप व युवा नेते शंभुराजे जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त साईदिप हॉस्पिटल, अहमदनगर यांच्या सहकार्याने ९ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ या वेळेत आधुनिक प्रणालीद्वारे मोफत सर्वरोग निदान व शस्त्रक्रिया आणि मोफत ॲन्जीओग्राफी शिबीर आयोजित करण्यात आले आहे
या शिबीरात ईसीजी व बीपी तपासणी आणि रक्तातील साखर तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच महात्मा फुले जनआरोग्य जीवनदायी योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शिबीरात ॲन्जीओग्राफी, प्रोस्टेट ग्रंथी ऑपरेशन, किडनीच्या आजाराकरीता मोफत उपचार व डायलेसिस ॲन्जीओप्लास्टी, मेंदूचे आजार, बायपास ऑपरेशन, फुफ्फुसाचे आजार, मणक्याचे ऑपरेशन, मुतखडा, कॅन्सर, पॅरालेसिस, गरोदर माता व स्त्रीरोग आदी आजारावरील रूग्णांची तपासणी मोफत केली जाणार आहे.
तसेच रूग्ण तपासणीसाठी हृयदरोग तज्ञ डॉ. किरण दिपक, डॉ. श्रीधर बदे, डॉ. गणेश मैड., मेंदूरोग व मणक्याचे विकार तज्ञ डॉ. भूषण खर्चे, त्वचारोग व केशविकार तज्ञ डॉ. प्रणाली राठोड, स्त्रीरोग तज्ञ डॉ. रोहन कुंभार, कन्सल्टींग फिजीशियन डॉ. मनोज कुंभार, अस्थिरोग तज्ञ डॉ.अभिजित सिंगल, बालरोग तज्ज्ञ डॉ.मेहवाश शेख, डॉ.प्राची जैन आदी तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. शिबीरात येताना रेशनकार्ड, आधारकार्ड, जुने रिपोर्ट आणणे आवश्यक आहे. हे शिबीर महात्मा गांधी विद्यालय येथे होणार असून याचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा; असे आवाहन आयोजकांनी केले आहे.