नागरीकांचे आरोग्य धोक्यात – पालिकेचा नियोजन शून्य कारभार : माजी नगरसेविका सविता कांबळे..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा नगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरी सुविधांचा अभाव झालेला आहे, शहरातील रस्ते, गटारी तसेच मैला मिश्रीत पाणी पिवुन नागरिक लहान मुले आजारी पडले आहेत, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे करमाळा नगरपरिषदेने तातडीने हे कामे करावीत या मागणीचे निवेदन बागल गटाच्या माजी नगरसेविका सविता जयकुमार कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्याना दिले आहे.
करमाळा शहरातील सिद्धार्थनगर, कुंकू गल्ली, खडकपुरा या भागात टाकलेल्या पाईपलाईनचे मैलामिश्रित दुषित पाणी येथील नागरिकांना जुलाब व उलटी सारखे आजार होत आहेत, लहान मुले सतत आजारी पडत आहेत. तसेच करमाळा शहरातील गटारीची आवस्था अत्यंत दयनीय झाली आहे, अनेक ठिकाणी तुडुंब गटारी भरून वाहत आहेत, रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत, प्रचंड प्रमाणात शहरात धुळीचे वातावरण झाले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, त्यामुळे करमाळा नगरपालिकेने गटारीची रस्त्याची तसेच सिद्धार्थ नगर,कुंकू गल्ली,खडकपुरा या भागात तातडीने नवीन पाईप लाईनची कामे करून घ्यावीत अन्यथा या भागातील महिलांना घेवून उपोषण व निदर्शने करणार असल्याचे या निवेदनात सविता कांबळे यांनी म्हटले आहे.