तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये 'यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या' विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.. - Saptahik Sandesh

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ‘यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या’ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडा व युवा सेवा संचालक महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग,पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

जिल्ह्यास्तरावर विजय संपादन करून विभागासाठी विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे .मल्लखांब स्पर्धेत गोरख लोंढे तसेच धनश्री पवार रोपमल्लखांबमध्ये विभागासाठी निवड व तलवारबाजीमध्ये श्वेता लक्ष्मण दळवी हिने सेबर व ईपी मध्ये प्रथम क्रमांक तर मुलांमध्ये रोहित अशोक दळवी फॉईलमध्ये तृतीय क्रमांक या दोन्ही विद्यार्थ्यांचे तलवारबाजीसाठी विभागाला निवड झालेली आहे . तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये फुटबॉलमध्ये मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला तर क्रिकेटमध्ये मुलीं जिल्हास्तरीय स्पर्धेत उपविजयी झाल्या . त्याचबरोबर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 19 वयोगटांमध्ये मुले व मुली या दोन्ही संघाने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक तर खो- खो क्रीडा स्पर्धेत मुले व मुली या दोन्ही संघाने तालुकास्तरीय स्पर्धे प्रथम क्रमांक मिळविला . तसेच तालुकास्तरीय वैयक्तीक क्रिडा स्पर्धेत यशस्वी झालेल्या खेळाडूची यादी पुढीलप्रमाणे

१९ वर्ष मुले –
२०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – ओम संभाजी जगताप
द्वितीय क्रमांक-
दिगंबर संजय शेलार
४०० मीटर धावणे-
प्रथम क्रमांक – ओम सुंदरदास मारकड
१५०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – ओम संभाजी जगताप
द्वितीय क्रमांक – सादिक याकुब मुलाणी
३००० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक- ओंकार नंदकुमार लोंढे
४०० मीटर अडथळा शर्यत-
प्रथम क्रमांक – शंतनू प्रभाकर जाडकर
४x४०० मीटर रिले-
प्रथम क्रमांक-
दिगंबर संजय शेलार
ओम सुंदरलाल मारकड
युवराज अर्जुन शेगर
अफजल समीर सिद्दीकी
क्रॉस कंट्री –
प्रथम क्रमांक – वैभव बाळू कदम
द्वितीय क्रमांक – नागेश राजेंद्र दौड
तृतीय क्रमांक – रितेश काकासाहेब पवार
चतुर्थ क्रमांक – अशोक नारायण बेदरे
लांब उडी –
प्रथम क्रमांक – ओम सुंदरलाल मारकड
तिहेरी उडी –
प्रथम क्रमांक – सिध्देश्वर रामा साळुंके
उंच उडी –
प्रथम क्रमांक – सोहेल अजीज शेख
गोळाफेक-
प्रथम क्रमांक – ओम सुनील जाधव
थाळीफेक-
द्वितीय क्रमांक – ओम सुनील जाधव
भालाफेक –
द्वितीय क्रमांक – सार्थक योगेश सुरवडे

१९ वर्ष मुली –
१०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – मोनिका रामभाऊ हजारे
२०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – मोनिका रामभाऊ हजारे
४०० मीटर धावणे –
द्वितीय क्रमांक – काजल विजय गावडे
८०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – श्वेता लक्ष्मण दळवी
द्वितीय क्रमांक – शिवानी नवनाथ सपकळ
१५०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – आस्मा अय्याज कबीर
३००० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – श्वेता लक्ष्मण दळवी
द्वितीय क्रमांक – काजल विजय गावडे
५ किमी चालणे –
प्रथम क्रमांक – पूजा अमोल जोगदंड

४x१०० मीटर रिले –
प्रथम क्रमांक –
श्वेता लक्ष्मण दळवी
मोनिका रामभाऊ हजारे
काजल विजय गावडे
ऋतुजा भाऊसाहेब ढेरे
४x४०० मीटर रिले –
श्वेता लक्ष्मण दळवी
गौरी बंडू जाधव
मोनिका रामभाऊ हजारे
काजल विजय गावडे
थाळीफेक –
प्रथम क्रमांक – काजल शशिकांत मगर
भालाफेक –
प्रथम क्रमांक – काजल शशिकांत मगर
लांब उडी –
प्रथम क्रमांक – आसमा अय्याज कबीर
हातोडा फेक –
प्रथम क्रमांक – सोनल प्रदीप सरडे
तिहेरी उडी –
प्रथम क्रमांक – ऋतुजा भाऊसाहेब ढेरेतालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे विजयी खेळाडू

१७ वर्ष मुले-
२०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – पृथ्वीराज युवराज साळुंके
४०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – पृथ्वीराज युवराज साळुंके
१५०० मीटर धावणे –
द्वितीय क्रमांक – श्रीकांत सचिन गणगे
तिहेरी उडी –
प्रथम क्रमांक – तुषार शिवलाल भोगे
११० मीटर अडथळा शर्यत –
प्रथम क्रमांक – तुषार शिवलाल भोगे

१७ वर्ष मुली-
८०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – प्रतीक्षा अनिल कांबळे
१५०० मीटर धावणे –
प्रथम क्रमांक – पायल दुर्वास वीर
३ किमी चालणे –
प्रथम क्रमांक – वैष्णवी तुकाराम जाधव
हातोडा फेक –
प्रथम क्रमांक- साक्षी धनंजय नाळे
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दक , कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!