सालसे येथील संतोष राऊत यांना राज्यस्तरीय 'ग्रामीण विकास कार्य गौरव पुरस्कार' प्रदान.. - Saptahik Sandesh

सालसे येथील संतोष राऊत यांना राज्यस्तरीय ‘ग्रामीण विकास कार्य गौरव पुरस्कार’ प्रदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सालसे. (ता.करमाळा) येथील अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष महादेव राऊत यांना महाराष्ट्र लोकविकास मंच अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामीण विकास कार्य गौरव पुरस्कार २०२२ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून १० डिसेंबर रोजी आनंदग्राम संस्थान बीड येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला. सदर पुरस्कार लोकविकास मंचचे अध्यक्ष विश्वनाथ तोडकर व उपाध्यक्ष भूमी पुत्र वाघ ,दत्तात्रय बारगजे आणि मनिषाताई घुले यांच्या हस्ते संपन्न झाला.

सदर पुरस्कार संतोष राऊत यांच्या समवेत वैशाली राऊत, योगेश जगताप व दशरथ कोळी यांनी स्वीकारला. अभिनव भारत समाज सेवा मंडळाने 2016 च्या दुष्काळात मराठवाड्यातील बीड ,ऊस्मानाबाद व लातूर जिल्हात . भरीव काम केल्याने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच पुरस्कार मिळाल्यामुळे ज्येष्ठ समाज सेवक प्रमोद झिंजाडे तसेच ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!