२० वर्षाच्या विवाहतेवर अत्याचार – आयटी ॲक्टनुसार एकावर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तु मला भेटायला ये.., नाहीतर मी आपल्या दोघांचे लग्नापूर्वीचे फोटो व व्हीडीओ तुझ्या वडीलांच्या मोबाईलवर पाठवेन; असे म्हणून एकाने २० वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी नेटकेवाडी (ता. कर्जत) येथील किरण राऊत याचे विरूध्द करमाळा पोलीसांनी अत्याचाराचा तसेच आय टि ॲक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

यात पिडीत विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की मी माझ्या माहेरी गुळसडी (ता. करमाळा) येथे असताना त्या ठिकाणी पोकलेनवर ऑपरेटरवर काम करणारा किरण राऊत याच्याशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. काही कालावधीनंतर माझे लग्न झाले.

लग्नानंतर ऑक्टोबर २०२२ ला मी दहा ते पंधरा दिवसासाठी माहेरी आले असताना, त्या ठिकाणी किरण राऊत आला व त्याने आपले पूर्वीचे फोटो व व्हीडीओ वडीलांच्या मोबाईलवर टाकेन.. अशी धमकी देऊन माझ्यावर अत्याचार केला. तसेच ११ डिसेंबर २०२२ रोजी मी व माझे पती पुणे येथे असताना माझे दीर यांनी माझ्या पतीला फोन करून सांगितले की.. किरण राऊत याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लिल फोटो पाठवले आहेत. त्यानंतर मी माझ्या पतीला सर्व हकीकत सांगितली. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी किरण राऊत याचेवर अत्याचाराचा व आय.टी.ॲक्टनूसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!