२२ वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार - तरूणाविरूध्द गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

२२ वर्षाच्या विवाहितेवर अत्याचार – तरूणाविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : शेतात काम करणाऱ्या २२ वर्षाच्या विवाहितेवर एकाने अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता केत्तूर जवळील शेतात घडला आहे.

या प्रकरणी तरूणाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की मी १३ डिसेंबर रोजी दिवसभर शेतातील काम करून पुन्हा सायंकाळी साडेसहा वाजता कोथिंबीर आणण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी आमच्या गावातील ओळखीचा सचिन शत्रुघ्न शेंडगे हा तरूण खूप दिवसापासून माझ्याकडे पाहत होता. त्या दिवशी अंधारचा फायदा घेऊन माझ्या मागे येऊन माझा विनयभंग करून माझ्यावर अत्याचार केला व जर हे कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या नवऱ्याला जीवे मारून टाकीन; अशी धमकी दिली व तो तेथून निघून गेला. या प्रकरणी करमाळा पोलीसांनी सचिन शेंडगे विरूध्द गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!