पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर – अर्ज करण्याची अंतीम मुदत 11 जानेवारी..
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता (१८) : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी वैयक्तीक लाभाच्या योजना सुरु झाल्या आहेत. सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिनांक ११ जानेवारी २०२३ पर्यंत स्विकारले जातील. अशी माहिती तालुका पशुधन अधिकारी डाॅ.प्रविण शिंदे यांनी दिली आहे.
जादा माहिती देताना ते म्हणाले की, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दुधाळ गायी/म्हशीचे वाटप करणे ‘राज्यस्तरीय- 1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन
व्यवसाय सुरु करणे, जिल्हास्तरीय योजना – तलंगा गट वाटप करणे, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय शेळी /मेंढी गट वाटप करणे, जिल्हास्तरीय योजना – एकदिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लांचे गट वाटप करणे अशा योजना आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागतील.
अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे फोटो ओळखपत्र, रेशन कार्ड , अपत्य दाखला , बचत गट सदस्य प्रमाणपत्र (लागु असल्यास) , रोजगार कार्ड (लागु असल्यास) , प्रशिक्षण (गोपालन वा शेळी पालन) (लागु असल्यास) , अपंग प्रमाणपत्र (लागु असल्यास) ,दारिद्र्य रेषेचा दाखला (लागु असल्यास), ७/१२ व ८ अ उतारा ,ग्रामपंचायत नमुना नं८, जातीचा दाखला(लागु असल्यास) ऑनलाईन अर्ज करण्याचे ठिकाण/संकेतस्थळ:https:ah.mahabms.com Anroid मोबाईल अॅप्लीकेशनचे नावः -AH. MAHABMS (प्ले स्टोअर वर उपलब्ध)
अर्ज करण्याचा कालावधी :- दिनांक १३.१२.२०२२ ते ११.०१.२०२३
अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती करमाळा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प सोलापुर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापुर, तालुका लघुपशुवैधकीय सर्वचिकिस्तालय, नजीकच्या पशुवैधकीय दवाखाना श्रे १/२ केंद्रावर संपर्क साधावा. टोल फ्री क्रंमाक १९६२/१८००-२३३-०४१८
असेही अवाहन डाॅ.शिंदे यांनी केले आहे.