आमदार संजयमामा शिंदे यांचा गाव-भेट दौरा ठरत आहे सर्वसामान्यांसाठी लाभदायक
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : आमदार संजयमामा शिंदे यांचा नुकताच करमाळा तालुक्यातील कंदर, पांगरे, वांगी, शेलगाव, भाळवणी, बिटरगाव, देलवडी, सांगवी १ व २, सावडी,भिलारवाडी,भगतवाडी गुलमोहर,वाडी हिंगणी, दिवेगव्हाण,कोमलवाडी, केतुर – १ केतुर -२, जिंती, रामवाडी,कावळवाडी, ढोकरी, भिवरवाडी आदी विविध गाव भेट दौरा संपन्न झाला.
या दौऱ्यामुळे गावागावातील लोकांच्या वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्नांवर चर्चा केली जात आहे. आमदार शिंदे हे अधिकारी, पदाधिकारी यांचेबरोबर चर्चा करून रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या सूचना देत आहेत. त्यामुळे असे दौरे सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक असल्याचे नागरिकांतून व्यक्त होत आहे.
- या दौर्यामध्ये गावातील वीज, रस्ते, पाणी आदी प्रश्नांबाबत चर्चा होत आहे.
- तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी शेतजमिनी कॅनाल करीता संपादीत झालेल्या आहेत तेथील किती शेतकऱ्यांना संपादनाचे पैसे मिळाले आहेत किती बाकी यावर चर्चा होत आहे.
- अनेक ठिकाणी आरोग्याच्या सुविधेविषयी प्रश्न मांडण्यात येत आहेत.
- काही ठिकाणी स्वातंत्र्य काळापासुन स्मशानभुमी, दफनभुमी नाही याचे प्रश्न समोर आले आहेत.
- काही नागरिकांमधुन शेती(पाणंद)रस्त्यासाठी मागणी केली जात आहे.
- फक्त अंगठा(थंब एक्सप्रेशन) उमटला नाही म्हणुन रेशनिंग बंद झाल्याचे तक्रारी मोठ्या प्रमाणात आहे.रेशनवरील माल व्यवस्थित दर्जाचा मिळत नाही अशा काही तक्रारी आहेत.
- याबाबत संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाला आमदार शिंदे यांनी तात्काळ सुचना दिल्या आहेत.
आदी सर्व बाबींमुळे आमदारांचा गावोगावीचा दौरा हा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक ठरत असल्याची चर्चा होत आहे.