जेऊरमधील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री करत "बाल महोत्सव" केला साजरा - Saptahik Sandesh

जेऊरमधील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री करत “बाल महोत्सव” केला साजरा

करमाळा : आज (दि. 12) जेऊर (ता.करमाळा) येथील जय मातृभूमी सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघ संचलित लिटिल एंजल्स स्कूल आणि अटल ज्ञान प्रबोधिनी या शाळांमध्ये संक्रांती निमित्त “बाल महोत्सव” साजरा करण्यात आला यामध्ये संक्रांती निमित्त आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा बाजार भरविण्यात आला होता.

या महोत्सवामध्ये सेंद्रीय भाजीपाला, फळे व धान्ये विक्रीस ठेवण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्या आपल्या घरच्या शेतात पिकलेल्या वस्तू आणल्या होत्या. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या वैशिष्ट्यपूर्ण बाजारामध्ये प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला. यासोबतच काही विद्यार्थ्यांनी तयार करून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अन्नपदार्थांचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

शाळेतील शिक्षक वर्गाच्या या संकल्पनेचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वर्गांनी खूप परिश्रम घेतले आणि त्यास पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Students from Little angel school and atal dnyan prabodhini Jeur celebrated “Bal Mahotsav” by selling organic vegetables | saptahik sandesh news Karmala Solapur

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!