वडीलांच्या स्मृतिदिनानिमित्त नगर पालिकेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप - Saptahik Sandesh

वडीलांच्या स्मृतिदिनानिमित्त नगर पालिकेच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

करमाळा : करमाळा येथील कै.मारुती भगवान अडसूळ ( गुरुजी) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांचे सुपुत्र करमाळा येथील शिक्षक अविनाश अडसूळ यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व न.प.मौलालीनगर शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. यामध्ये मिक्स वही 200 पानी, नटराज पेन्सिल कीट व खाऊ बिस्कीट पुडा वाटप केले. अविनाश अडसूळ हे सध्या दौंड तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

मौलाली माळ येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करताना
आंबेडकर प्रशालेत शैक्षणिक साहित्य वाटप करताना

यावेळी केंद्र समन्वयक श्री.दयानंद चौधरी, श्री. कोकाटे, मुख्याध्यापक श्री.राऊत व मुख्याध्यापक श्री. धायतोंडे, उपशिक्षक दि.तु.जाधव, मालन शेख व श्रीमती चवरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!