आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त अभिवादन - Saptahik Sandesh

आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : फातिमा शेख यांच्या ९ जानेवारी रोजी झालेल्या व राजमाता जिजाऊ यांच्या १२ जानेवारीला झालेल्या जयंती निमित्ताने करमाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी चळवळीच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व फातिमा शेख यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

येथे डॉ यावेळी करमाळा नगरपालिकेच्या उर्दू शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ यांची प्रतिमा देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!