लहान मुलांच्या अनेक पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिंटूची क्रेझ आजही कमी झालेली नाही
आज टीव्ही वर तसेच युट्यूब, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक कार्टून्स सिरीयल, सिनेमे आले. त्यामुळे चित्रकथेंच कुतुहल आजच्या पिढीतील लहान मुलांना कदाचित कमी असेल, परंतु युट्यूब येण्याआधी अनेक वर्षे चिंटू नावाच्या चित्रकथेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना भुरळ पाडली. चिंटू घराघरात लाडका झाला. लोक आपल्या लहान मुलांना चिंटू आवर्जून वाचायला द्यायचे किंवा वाचून सांगायचे. अनेकांनी आपल्या मुलांची नावे लाडाने चिंटू ठेवले जायचे. चिंटूची क्रेज मात्र आजही कमी झाली नसल्याचे दिसते.
चिंटू ही मराठी विनोदी चित्रकथा सकाळ वृत्तपत्रात 21 नोव्हेंबर 1991 पासून प्रकाशित होयला सुरुवात झाली. पुण्यातील चारुहास पंडित व प्रभाकर वाडेकर या व्यंगचित्रकारांनी या चिंटूची चित्रकथा सुरू केली. अनेक वर्षे सकाळ वृत्तपत्रामध्ये तसेच काही वर्षे लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये चिंटू चित्रकथा प्रसिद्ध झाली.
वृत्तपत्रांमध्ये चिंटू वाचलेल्या त्या पिढीतील मुलांना आजही चिंटूची तेवढीच आवड आहे.
आता त्या पिढीतील मुलांना मुले झाली असतील तरीही चिंटू अजूनही तेवढाच आहे (विनोदाचा भाग). सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रसिद्ध होणारा चिंटू कालांतराने रंगीत चित्रकथेत आला. चिंटू या चित्र कथेची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. आजही ती विक्रीस उपलब्ध आहेत. चिंटूचे विविध प्रकाशित पुस्तके ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वापरा –https://purandareprakashan.in/
चिंटूच्या यशामुळे चिंटू वर दोन चित्रपट ही तयार करण्यात आली आहेत २०१२ साली चिंटू १ व २०१३ मध्ये चिंटू २ प्रसिद्ध झाला. परंतु हे दोन्ही चित्रपट ॲनिमेशन रूपात नसल्याने म्हणजेच इतर चित्रपटासारखे मानवी कलाकारांना घेऊन केल्यामुळे लोकांना एवढे पसंत पडले नाहीत.त्यानंतर एनिमेशन रुपात देखील चिंटू आला. युट्यूब वर त्याचे एनिमेशन रुपातील भाग प्रसिद्ध झाले. त्यांना लाखों मध्ये views मिळाले.
चिंटूच्या निर्मात्यापैकी प्रभाकर वाडेकर यांचे 2013 साली निधन झाले. दुसरे निर्माते चारुहास पंडित यांनी चिंटू चित्रकथा अजूनही त्याच जोमाने सुरू ठेवली असून फेसबुक पेज (chintoo) व इन्स्टाग्राम वर चिंटू टून्स (chintoo toon) हे पेज आहे त्यावर ते चिंटू प्रसिद्ध करतात.
पूर्ण पोस्ट वाचण्यासाठी पेज स्वाईप करा
चिंटू चित्रकथेची थीम (संकल्पना) :
चिंटू हा मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील एका सामान्य मुलाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या दैनंदिन जीवनातील सामान्य घटनांना या व्यंगचित्र मालिकेत विनोदी चेहरा देण्यात आला आहे. त्याच्या वयाच्या इतर मुलांना ज्या समस्यांचा सामना करावा लागतो तसाच सामना चिंटूला या चित्रकथेत करावा लागतो जसे की पालकांकडून अभ्यासाचा दबाव, चांगल्या सवयी लावणे, खोड्या केल्यावर पालकांकडून रागावणे इत्यादी. त्याला खोड्या करण्यातही मजा येते. त्याला साध्या साध्या गोष्टींतून मजा येते. जोशीकाकूंच्या झाडावरचे आंबे चोरणे, क्रिकेट बघणे यात त्याला मजा येते. त्याला पाळीव प्राणी पाळणे आवडते, परंतु त्याचे पालक नेहमी त्याला पाळीव प्राणी ठेवण्यास नकार देतात.
चिंटू चित्रकथेतील पात्रे –
- पप्पा : चिंटूचे वडील. ते व्यवसायाने अभियंता असतात.
- आई : चिंटूची आई गृहिणी आहे. तिचे नाव दीपा.
- आज्जी : चिंटूची आजी खूप प्रेमळ आणि काळजी घेणारी आहे.
- आजोबा : चिंटूचे आजोबा चिंटूला कोणत्याही खेळणीची गरज भासते तेव्हा चिंटू त्याच्या आजोबांकडे जातो जे नेहमी चिंटूच्या मागण्या पूर्ण करतात.
- पप्पू : चिंटूचा चांगला मित्र. चिंटूला धोका असताना मदत करणारा मुलगा. पण मग, राजू हा कोणाचाही सामना करण्यापेक्षा मोठा धोका आहे. पप्पू हा प्राणीप्रेमी असून त्याला विशेषतः कुत्र्याची पिल्ले आवडतात. तोही खूप खोडकर आहे.
- मिनी : ग्रुपमधली एक मुलगी. तिला शाळेत जाणे, परीक्षा आणि अभ्यास या सर्व गोष्टी आवडतात. ती मनाने कवयित्री आहे पण तिच्या कविता समूहातील कोणालाही आवडत नाहीत. चिंटूला मिनीच्या आवडीच्या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत. चिंटूचे मिनीशी सतत भांडण होते.
- बगळ्या : किडकीडीत, भोळसट बंटी नावाचा कुत्रा त्याच्याकडे असतो.
- राजू : ग्रुप मधील शारीरिकदृष्ट्या मजबूत परंतु मानसिकदृष्ट्या मंद व्यक्ती. मिनीच्या कविता आवडतात, पण मग ते कौतुक नाही. तुम्ही त्याची चेष्टा केली तरी त्याला विनोद पटकन समजत नाहीत. म्हणून, जर तुम्ही वेगवान असाल तर तुम्ही त्याच्याबद्दल विनोद करू शकता आणि दूर जाऊ शकता. जर त्याने तुम्हाला पकडले तर तुम्हाला मारहाण केली जाईल. चिंटूला राजूची चेष्टा करायला आवडते आणि तो राजूला मारत राहतो.
- जोशी काकू : चिंटूच्या शेजारी फळझाडांनी भरलेली मोठी बाग आहे. तिथले फळ चोरली की त्या मुलांना ओरडतात. क्रिकेटचा चेंडू नेमका जोशीकाकूच्या काचेच्या खिडक्यांमधून आत जातो. तिला चिंटू आवडतो पण ती तसे दाखवत नाही.
- जोशी काका : जोशी काकूंचे पती. दृश्यात फार क्वचित दिसतात
- सोनू : गटातील लहान मूल. त्याला नेहमीच संकटांचा सामना करावा लागतो आणि प्रत्येकजण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो. शर्टाला रुमाल बांधलेला असतो नेहमी.
- बंटी कुत्रा : तो बगळ्याचा लहान तपकिरी-पिवळ्या रंगाचा पाळीव कुत्रा आहे. चिंटूला नेहमी बंटीसारखा कुत्रा घरात ठेवायचा असतो.
- नेहा : ग्रुपमधली आणखी एक मुलगी. दृश्यात फार क्वचित दिसतात.
- सतीश दादा : चिंटूचा शेजारी. खूप फिल्मी कॉलेज जाणारा मुलगा