मकर संक्रातीनिमित्ताने कमला भवानी मंदिर व संगोबा मंदिरात महिलांनी केली गर्दी
करमाळा – करमाळा (जि. सोलापूर) येथील कमला भवानी देवी मंदिरात व संगोबा मंदिरात आज (दि.१५) मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मकर संक्रातीच्या निमित्ताने महिला ओवसण्यासाठी व दर्शनासाठी देवीच्या मंदिरात येत असतात. सकाळपासूनच मंदिरात महिलांच्या रांगा लागल्या होत्या. याचबरोबर संगोबा येथील आदिनाथ महाराज मंदिरात देखील ओवसण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती. संगोबा येथे विविध खेळणी व खाण्याचे स्टॉल लागल्याने इथे छोट्या यात्रेचे स्वरूप तयार झाले होते.