पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करमाळा तालुक्यासाठी 10 कोटी निधी मंजूर - आमदार संजयमामा शिंदे.. - Saptahik Sandesh

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करमाळा तालुक्यासाठी 10 कोटी निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 9 कोटी 95 लाख 76 हजार असा भरीव निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.

या निधी बरोबरच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूनही प्रास्तावित केलेला निधी लवकरच जाहीर होईल, त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न सुकर होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

हा निधी मंजूर करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सहकार्य लाभल्याचा आवर्जून उल्लेख आमदार शिंदे यांनी केला .या निधीमधून पांगरी ते वांगी या रस्त्याची सुधारणा करणे ,चढ काढणे या कामासाठी 4 कोटी 66 लाख 50 हजार निधी मंजूर असून करमाळा हिवरवाडी, वडगाव दक्षिण ते वंजारवाडी या ग्रामीण मार्गाची सुधारणा करण्यासाठी 5 कोटी 29 लाख 26 हजार असा निधी मंजूर आहे.

येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण मार्गाच्या सुधारण्यासाठी 30 54, 5054 या निधीमधून ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्यावर आपला प्रामुख्याने भर असल्याचे माहिती आमदार शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!