गीतादेवी आगरवाल यांचे निधन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील रामभरोसे हॉटेलचे मालक ललित आगरवाल यांच्या मातोश्री गीतादेवी लक्ष्मीनारायण आगरवाल ( वय – ८०) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. गीतादेवी आगरवाल या अतिशय दयाळू व कष्टाळू होत्या. पहाटे पाचला रामभरोसे हॉटेल उघडून त्या काम सुरू करत होत्या.
सर्व नातेवाईकांशी त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचेवर सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक ललित आगरवाल यांच्या मातोश्री तर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल व ॲड. प्रियाल आगरवाल यांच्या त्या आजी होत.