भुमी अभिलेख कार्यालयाच्या दुर्लक्षितपणा विरूध्द शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा.. - Saptahik Sandesh

भुमी अभिलेख कार्यालयाच्या दुर्लक्षितपणा विरूध्द शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : येथील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक व त्यांचे कर्मचारी गेल्या अनेक महिन्यापासून पोटखराब जमिनीची नोंद लागवड क्षेत्रात जाणिवपूर्वक करत नाहीत त्याविरूध्द येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी भुमिअभिलेख कार्यालय समोर पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा पोंधवडी (ता. करमाळा) येथील दादा परबत राऊत या शेतकऱ्याने दिला आहे.

याबाबत राऊत यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, भुमिअभिलेख कार्यालय या सर्वांना लेखी पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १२/१०/२०२१ ला पोंधवडी येथील गट नं. १५३/१ चे पोटखराब जमीन लागवड क्षेत्रात समाविष्ट करणेबाबत अर्ज दिला होता. त्याचा पंचनामा होऊन त्याचा अहवाल मंडल अधिकाऱ्याने तहसीलदार यांचेकडे दिला. तहसीलदाराने ३/६/२०२२ ला या बाबतचा सविस्तर अहवाल उपअधिक्षक भुमिअभिलेख करमाळा यांना पाठविला व योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वारंवार प्रयत्न करूनही उपअधिक्षक कार्यालय भुमिअभिलेख कोणतीही कार्यवाही करत नसल्याने आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याने श्री. राऊत यांनी म्हटले आहे. श्री. राऊत यांनी दिलेल्या निवेदनानंतर महसुल विभागात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!