केळी उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र पाटील - Saptahik Sandesh

केळी उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेंद्र पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : महाराष्ट्र राज्य शेतकरी केळी उत्पादक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी बिटरगाव सांगवी (ता.करमाळा) येथील प्रगतिशील शेतकरी महेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील केळी उत्पादकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी केळी उत्पादक संघाची स्थापना करण्यात आली आहे. संपुर्ण राज्यभारात या संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन करण्यात आले असून या माध्यमातून केळी उत्पादकांच्या विविध समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संघाचे अध्यक्ष चव्हाण यांनी सोलापुर जिल्ह्यातील काम गतीमान करण्यासाठी करमाळा तालुक्यातील हुशार अनुभवी व प्रगतिशील शेतकरी जिल्हाध्यक्षपदी महेंद्र दिनकरराव पाटील यांची निवड केली आहे.

संघाचे तज्ञ संचालक नामदेव वालेकर करमाळा तालुका शेतकरी केळी उत्पादक संघाचे तालुका अध्यक्ष वैभव पोळ यांच्या उपस्थितीत त्यांना जिल्हाध्यक्षपदी निवडीचे पत्र देण्यात आले. निर्यातक्षम केळी उत्पादनात सोलापूर जिल्हा अग्रेसर असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जाते तरी केळी उत्पादकांच्या समोर अनेक समस्या असून अद्यापही केलेला हमीभाव शासनाने जाहीर केलेला नाही यासाठी संघाच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करणार असून केळी उत्पादनाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडीनंतर महेंद्र पाटील यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!