बंडातात्यांसारख्या महात्म्यांची या राज्याला व देशाला गरज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, (ता.१७) : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर करणारे श्रद्धेय बंडातात्या कराडकर हे आमच्यासाठी सदैव पूज्य आहेत. त्यांनी आज पावेतो केलेली संत साहित्याची साधना व व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळ याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राकडे आहे. त्यांना झालेला पक्षघाताचा त्रासातून ते लवकर मुक्त व्हावे अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे
ह.भ.प.बंडातात्य कराडकर यांचेशी मुख्यमंत्र्यांनी व्हीडीओकाॅन्फरन्सव्दारे संवाद साधला अशी माहिती
धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी दिली.
याबाबत ते म्हणाले की, पू.तात्यांच्या उपचारांचे वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजता क्षणी श्रद्धेय तात्या जितके समाजाचे तितकेच ते माझेदेखील आहेत. मागील ३ दिवस स्वतः मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे मुंबई आणि नागपूरहुन प्रवास करत व्यक्तिगतरित्या भेट देऊन सुरु असणाऱ्या उपचारांवर लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारेही तात्यांशी संवाद साधला. पू. तात्यांचा अनुयायी व परिवार वर्ग हा खूप मोठा आहे. मात्र तात्या हे माझ्या कुटूंबाचा भाग आहेत. त्यांनी आजपवेतो धर्मरक्षणासहित समाजहितासाठी दिलेलं योगदान पाहता त्यांच्या उपचारासाठी मी व्यक्तिगत लक्ष देणे गरजेचे तसेच माझे कर्तव्य आहे ही संवेदनशील भावना त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर त्यांच्या रुग्णालयातील सर्व उपचारांसाठी येणारा खर्च देखील आम्ही करत आहेत.
खा.डाॅ. श्रीकांत शिंदे हे सुध्दा त्यांच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. खासदार डॉ.श्री.श्रीकांतजी शिंदे फाउंडेशनच्या वतीने तात्यांच्या उपचारार्थ येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा धनादेश मंगेश चिवटे यांनी व्यसनमुक्त युवक संघाकडे केवळ सेवा या भावनेने कुठेही चर्चा न करता सुपूर्दही केला. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ भिलारे देखील प्रत्येक वेळी विशेष लक्ष देत उपस्थित आहेत.धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने व माझे तात्यांचे पारिवारिक सबंध असल्याने व्यक्तीगतरीत्या आम्ही देखील रुग्णालयातच बहुतांश वेळ उपस्थित आहोत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला व्यसनमुक्त युवक संघाचा प्रत्येक कार्यकर्ता तात्यांवर जीवापाड किती प्रेम करतो हे याची देही याची डोळा मी मागील अनेक दिवस अनुभवतोय . माझ्या सर्व गुरुबंधूंना आपण दाखवलेल्या संयम व शिस्तीबद्दल देखील
अक्षयमहाराज भोसले यांनी विशेष आभार मानले आहेत.