केम-भोगेवाडी रस्त्यावरील वीज तारा ऊस वाहतुकीस धोकादायक -पोल बसविण्याची मागणी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) :भोगेवाडी (ता.माढा) येथील केम-भोगेवाडी रस्त्यावरील वीज तारा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आडव्या येतात, त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे, तरी वीजमंडळाने या ठिकाणी पोल बसवून तारा ओढाव्यात अशी मागणी पोलीस पाटिल सुरेश पाटिल यांनी वीज मंडळ कार्यालय कुर्डूवाडी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

त्या निवेदनात म्हटले आहे कि सध्या शेतकऱ्यांची ऊस वाहतूक सुरू आहे. केम येथे रेल्वे पुलावर गाडया बसत नसल्याने कमला भवानी आष्टी,विहाळ या कारखान्याकडे जाणारा ऊस भोगे वाडी मागें नेला जातो. भोगेवाडी येथे या रस्त्यावर तारा आडव्या येतात. त्यावेळेस या गावातील वीज प्रवाह बंद करून तारा उचलून ट्रॅक्टर काढावे लागतात. त्यामुळे एखादया वेळेस शॉर्टसर्किट होऊन अनर्थ घडण्याची शक्यता आहे. तरी वेळीच वीज मंंडळाने लक्ष घालून या ठिकाणी पोल बसवून तारा वर घ्याव्या अशी मागणी केली आहे.