केम येथे स्व.ठाकरे यांची जयंती ऊस तोडणी कामगारांसोबत केली साजरी - Saptahik Sandesh

केम येथे स्व.ठाकरे यांची जयंती ऊस तोडणी कामगारांसोबत केली साजरी

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती केम (ता.करमाळा) येथील ऊस तोडणी कामगारांसोबत साजरी करण्यात आली. यावेळी महिला ऊस तोडणी कामगारांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

महिला आघाडीच्या प्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी या जयंती कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सुरुवातीला स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आघाडीच्या प्रमुख वर्षाताई चव्हाण यांनी व केम शहरप्रमुख सौ.मोरे यांनी केले. यावेळी सावित्रीबाई जाधव,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख ऊत्तरेश्वर तळेकर, पत्रकार संजय जाधव,सोन्या,सुरवसे, भैय्या चव्हाण, ओंकार जाधव, तसेच ऊसतोड मजूर संतोष,आडे,देविका,आडे, रेणूका राठोड,अरूण आडे,रेणूका राठोड,गणेश आडे, निमा आडे नितेश जाधव, प्रियंका जाधव, निलेश राठोड, वंदना राठोड, विजय राठोड,कपिला राठोड, ऊमेश आडे, साधना आडे मयुर बिचीतकर आदिजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!