करमाळा येथे वरिष्ठ स्तर न्यायालयास अंतिम मंजुरी – ५ फेब्रुवारीला होणार उद्घाटन कार्यक्रम..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायालयास अंतिम मंजुरी मिळालेली असून येत्या ५ फेब्रुवारीला या वरिष्ठ स्तर न्यायालयाचा उद्घाटन समारंभ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पि.के.चव्हाण यांचे शुभहस्ते व मुंबई उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती एस. जी. दिघे यांचे प्रमुख उपस्थितीत तसेच सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश शब्बीर औटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे आमंत्रण करमाळा वकील संघातर्फे वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. प्रमोद जाधव तसेच ॲड. राजेश दिवाण, ॲड.बलवंत राऊत, ॲड. प्रशांत बागल व मुंबई उच्च न्यायालयातील ॲड.सचिन देवकर, ॲड.सौ मांगले -शिंगाडे यांच्यातर्फे २३ फेब्रुवारी ला मुंबई उच्च न्यायालयीन न्यायमूर्ती पि.के.चव्हाण व न्यायमूर्ती एस.जी. दिघे यांना मुंबई उच्च न्यायालय येथे देण्यात आले. याप्रसंगी करमाळा वकील संघाचे आमंत्रणास मान देवुन न्यायमूर्ती पि.के.चव्हाण व न्यायमूर्ती एस.जी.दिघे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत आश्वासन दिले.