गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबच्यावतीने उद्या २५ जानेवारीला गणेश जयंती उत्सवानिमित्त महाप्रसाद.. - Saptahik Sandesh

गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबच्यावतीने उद्या २५ जानेवारीला गणेश जयंती उत्सवानिमित्त महाप्रसाद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील वेताळपेठ येथील गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबच्यावतीने २५ जानेवारी रोजी गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असून, यावर्षी सहा हजार नागरीकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे; अशी माहिती गजानन स्पोर्टस् क्लबचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली.

याबाबत श्री. ढाळे म्हणाले, की गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबच्यावतीने दरवर्षी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. कोरोनामुळे मोठ्याप्रमाणात गणेश जयंती आली नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या स्वरूपात जयंती उत्सव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची तयारी करण्यात आली असून, २५ जानेवारीला सहस्त्रआवर्तन व गणेशयाग सोहळ्याचे आयोजन केले आहे. सायंकाळी सहा ते दहा यावेळेत महाप्रसाद होणार आहे. हा कार्यक्रम नागरपंचाचा वाडा, वेताळपेठ येथे होणार आहे. तरी करमाळा शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत ढाळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!