ऊसाची ट्रॉली लावण्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आमच्या हद्दीत ऊसाची ट्रॉली का लावली या कारणावरून दोघा जणांनी दोघांना बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार लव्हे (ता. करमाळा) येथे २१ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता घडला आहे.
या प्रकरणी अजय ज्योतीराम खबाले (रा.लव्हे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आमच्या शेतीत ऊस तोडण्याचे काम चालू असताना मी ऊसाचे वाडे गोळा करीत असताना आजिनाथ धनंजय खबाले व त्याची आई लक्ष्मी धनंजय खबाले हे आले व आमच्या हद्दीत ऊसाची ट्रॉली कोणाला विचारून लावली असे म्हणून आजिनाथ याने पडलेला दगड उचलून माझ्या डोक्यात मारून मला दोघांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय माझा भाऊ मला सोडण्यास आला असता, त्यालाही या दोघांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
