पाथुर्डी येथे विहिरीवरील पंपाची चोरी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पाथुर्डी येथे विहिरीत पाणी काढण्यासाठी सोडलेली पाच एचपीची पाणबुडी मोटार तसेच स्टार्टर व सर्व्हीस केबल असा एकूण २६ हजार रूपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी सुनील अंकुश कोरे (रा. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १७ जानेवारीला सायंकाळी सात वाजता शेतातून घरी आलो त्यावेळी पाणबुडी मोटार, स्टार्टर व सर्व्हीस केबल होती. १९ जानेवारीला शेतात गेलो असता या वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
