पशु संवर्धन विभाग, ग्रामपंचायत सालसे व अभिनव भारत तर्फे पाच गावातील जनावरांना मोफत 'लंपी' चे लसीकरण - Saptahik Sandesh

पशु संवर्धन विभाग, ग्रामपंचायत सालसे व अभिनव भारत तर्फे पाच गावातील जनावरांना मोफत ‘लंपी’ चे लसीकरण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सालसे (ता.करमाळा) व परिसरातील पाच गावातील जनावरांना लम्पी रोगाचे मोफत लसीकरण देण्यात आले. हे लसीकरण पशु संवर्धन विभाग व ग्रामपंचायत सालसे आणि अभिनव भारत समाज सेवा मंडळ सालसे यांच्या संयुक्त विदयमाने घेण्यात आले.

सालसे गावचे सरपंच सतीश आहोळ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व गो मातेची पुजा करून लसीची सुरवात करण्यात आली, यावेळी पशुधन विकास अधिकारी वर्ग १, साडे डॉ हेमंत अनारसे व डाँ.बारकुंड यांनी लसीकरण केले, या सोबत सालसे ,साडे, आळसूंदे,घोटी व वरकुटे या गावात जनावरांना लसीकरण केल्याचे डाँ. हेमंत अनारसे यांनी सांगीतले.

यावेळी सालसे गावचे प्रथम नागरीक सतीश ओहोळ, ग्रामसेवक अनिल कब्जेकर , अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत ,गोकुळ पवार , बबन मेंगडे, नागनाथ ओहोळ भाऊ घाडगे,बबन लोकरे, शुभम रुपनर, नामदेव कोळी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!