खांबेवाडीच्या वैशाली लवटे यांचा पोलिस आयुक्त नांगरे पाटील यांच्याकडून सन्मान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : मूळच्या खांबेवाडी ( ता. करमाळा ) येथील असलेल्या व सध्या मरीन ड्राईव्ह (मुंबई) पोलीस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक पदावर काम करत असलेल्या वैशाली अंबादास लवटे यांना बृहन्मुंबई पोलिस सह आयुक्तालयाकडून निर्भया पथकामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एका विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

निर्भया पथकामध्ये काम करताना महिलांविषयी तक्रारी/ नियंत्रण कक्षाचे संदेश यांची गांभीर्याने दखल घेत तसेच हद्दीत क्यू आर कोड नुसार सतत गस्त घालून ८ महिन्यात जास्तीत जास्त महिलांना मदत पुरविण्यात प्रथम श्रेणीची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. हे प्रशस्तीपत्र त्यांना पोलीस सह.आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. हा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी पार पडला. यानंतर करमाळा तालुक्यातुन विशेषतः खांबेवाडी परिसरातून वैशाली लवटे यांचे व परिवाराचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Vaishali Lovete of Khambewadi honored by Police Commissioner Nangre Patil | saptahik sandesh news karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!