दिनेश मडके यांची ‘डिजिटल मिडिया’ पत्रकार संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : ‘डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेच्या’ करमाळा तालुकाध्यक्षपदी ‘साप्ताहिक पवनपुत्रचे’ संपादक दिनेश मडके यांची निवड करण्यात आली आहे.

श्री मडके यांची डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांचे हित जोपसण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून सामाजिक मुल्य तसेच जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत करण्यासाठी डिजिटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी ही निवड केली आहे.

पत्रकार दिनेश मडके हे कुणबी मराठा समाजसेवा संघाचे तालुकाध्यक्ष असून करमाळा तालुका पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष आहेत तर जीवनज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून श्री मडके यांनी जगद्गुरु नरेद्रांचार्य महाराज भक्त सेवा मंडळाचे अकरा वर्ष तालुकाध्यक्ष जिल्हाप्रसिध्दी प्रमुख म्हणुन काम केले आहे.करमाळा तालुक्यातील विविध सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग असुन गेली चौदा वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे त्यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


डिजीटल मिडिया संघटनेच्या माध्यमातुन तालुक्यातील पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा मानस असुन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गुरुवर्य राजा माने, जिल्हाध्यक्ष सतिश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. लवकरच तालुका कार्यकारिणी करणार असुन या संघटनेत सहभागी होण्यासाठी पत्रकार बांधवांनी संपर्क साधावा असे आवाहन तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!