महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सरपडोह येथे शेतीशाळेचे आयोजन…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी ऊस पिकाविषयी “शेतकऱ्यांची शेती शाळा” हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी करमाळा व मंडळ कृषी अधिकारी जेऊर यांचे मार्फत घेण्यात आली.
करमाळा तालुका कृषीधिकारी संजय वाकडे यांचे मार्गदर्शना खाली सरपडोह येथे ऊस पिकाची शेती शाळा कृषी विभागचे, कृषीसहाय्यक सचिन सरडे यांचे मार्फत घेण्यात अली. संपूर्ण राज्यात कृषी विभाग मार्फत विविध योजना मधून क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत पिकनिहाय शेतीशाळ येत आहे.
शेती शाळा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्यात शेतात पिकांची आणि शेती परिस्थितीचा अभ्यास करण्यास शिकविणे, शेती संदर्भात उद्धभवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय स्थानिक पातळीवर शोधण्याचा प्रयत्न करणे, आजच्या शेती शाळा मध्ये ऊस पिका संदर्भात उसाचे बेने प्रक्रिया करणे, बेने निवड करणे, उसाचे पाणी व्यस्थापन ऊस पिकाचे खत व्यस्थापन एकरी उसाची एकूण संख्या किती असावी, एकरी ऊस साधारण किती किलोचा असावा खोडकिडा व्यस्थापन, कीडव्यस्थापन वरील सर्व विषयांवर शेतकर्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
गावातील मारुती बबन यादव यांचे उस शेतातामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून उसातील फुटवे सरीतील अंतर किडाचा होणारा पादुर्भाव ऊस तुटाळे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यानी खतांचा, योग्य पाण्याचा वापर केल्यास सरासरी ७०ते ९० टन एकरी उत्पादन निघू शकते यावेळी एकरी दीडशे टन उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस शेतील भेट देण्याचे ठरविण्यात आले.
शेतकऱ्यांना आवश्यक असणारे कृषी ॲप या शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेण्याविषयी आवाहन करण्यात आले. कृषी ॲप शेतकऱ्यांच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे, असे सांगण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी पांडुरंग वाळके उपसरपंच नाथराव रंदवे, प्रदीप भंडारेसाहेब, भारत यादव, रामभाऊ बोंद्रे , लक्ष्मण बोंद्रे, काकासाहेब वाळके मारुती यादव, शिवाजी भंडारे, कैलास भंडारे, जोतीराम यादव, प्रभाकर भंडारे, अतुल नलवडे, राजेंद्र यादव, बबन रंदवे ,चंद्रकांत नांगरे परिसरातील शेतकरी उपस्थित होते, उपस्थित शेतकरी व अधिकारी यांचे नाथराव रंदवे उपसरपंच सरपडोह यांनी आभार मानले.