करमाळा तालुक्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून सरसकट पंचनामे करावे – रयतक्रांती संघटना
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सध्या करमाळा तालुक्यात व परीसरात जोरदार पाऊस होत असून नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत, तसेच शेताला नदीचे स्वरूप आले असून शेतकरीवर्ग हताश झाला आहे. त्यांना मदत म्हणून पिकाचे पंचनामे करून मदत करण्यात यावी अशी मागणी रयतक्रांती संघटनेकडून करण्यात आली.
या मागणीचे निवेदन रयतक्रांती संघटना यांचे मार्फत तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निहाय पंचनामे करण्यात यावेत, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेवून तहसील कार्यालयावर हलगीनाद आंदोलन करण्यात येईलअशा इशारा देण्यात आला.
यावेळी रयत क्रांति राज्य सदस्य अजय बागल, तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे, मा.तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बळीराजा संघटना जिल्ह्य़ाध्यक्ष आण्णा सुपनवर, विजय सलगर, शंकर सूळ, बापू देवकते, शिवाजी राऊत, संतोष वाघे, बाळासाहेब नरसाळे आदी शेतकरी उपस्थित होते.