वीज पडून सालसे येथील खोंड दगावले - Saptahik Sandesh

वीज पडून सालसे येथील खोंड दगावले

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : काल(दि.११) रोजी सालसे (ता. करमाळा) येथे परतीच्या पावसाने झोडपून काढले असून ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामध्ये २ वर्षाचे खोंडाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

सालसे मध्ये परतीच्या पावसाने कहर केला.
या पावसात विविध पिकांचे नुकसान झालेले असून अनेक रस्ते पाण्याने वाहून गेलेले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे. याबरोबरच अनेक लोकांच्या घराची पडझड झालेली आहे.

याबरोबरच सालसे गावामधील गोरख कृष्णा सालगुडे यांचे २ वर्षाचे जवळपास पन्नास हजार रुपये किमतीचे खोंड वीज पडल्याने दगावले आहे. रात्री उशिरा साडे येथील सरकारी दवाखानातील डॉ. अनारसे, तलाठी बिराजदार, तसेच ग्रा. सदस्य अशोक पवार, कोतवाल संतोष ओहोळ यांनी रात्री उशिरा ६ वाजता पोस्टमॉर्टम केले.

A log in Salse was burnt due to lightning | saptahik sandesh news karmala Solapur| Salase News

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!