उमरड-अंजनडोह रस्ता निकृष्ट दर्जाचा बनविला
समस्या – उमरड ते अंजनडोह या रस्त्याचे डांबरीकरण
करून फक्त दोनच महिने झालेत. तरीदेखील या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्ता तयार करताना डांबर व कच कमी प्रमाणात टाकली गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी.
समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – सार्वजनिक बांधकाम विभाग
समस्या मांडणारे – आप्पासाहेब कोठावळे, उमरड ता.करमाळा