पगार न देणाऱ्या कॉन्ट्रॅकटर विरूध्द गुन्हा दाखल - Saptahik Sandesh

पगार न देणाऱ्या कॉन्ट्रॅकटर विरूध्द गुन्हा दाखल

करमाळा(दि.२८): वीज वितरण कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार एमएसईबी कार्यालयकडून मिळवूनही कॉन्ट्रॅक्टर व सुपरवायझर यांनी पगार दिला नाही. त्यामुळे कामगारांनी त्यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणी बाळू विष्णू भांडवलकर (रा. वडगाव उ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी व माझा मित्र तात्या साहेबराव वीर (रा. पांडे) आम्ही विज वितरण कंपनीच्या सोनू सर्व्हिसेस या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करत आहोत. वीज वितरण कंपनीने आमचा पगार कॉन्ट्रॅक्टरकडे जमा करूनही कॉन्स्ट्रॅक्टर आशपाक शेख व सुपरवायझर इकबाल इनामदार यांनी २ लाख ५९ हजार रूपयाचा पगार आम्हाला न देता फसवणूक केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सुलेखन-प्रशांत खोलासे, केडगाव ता.करमाळा (मो. 9881145383)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!