एस.टी.वाहकाची अरेरावी : प्रवाशाची बॅग फेकून केले लॅपटॉपचे नुकसान.. - Saptahik Sandesh

एस.टी.वाहकाची अरेरावी : प्रवाशाची बॅग फेकून केले लॅपटॉपचे नुकसान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : एसटीनेच प्रवास करावा.. यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध प्रयत्न करत आहे. अशा या प्रयत्नावर एसटीतील काही कर्मचारी पाणी फिरवत आहेत. याची प्रचिती नुकतीच आली असून परांडा डेपोच्या वाहकाने वीट येथे प्रवाशास शिव्या देऊन त्याची बॅग एसटीच्या खाली फेकून देवून बॅगेतील लॅपटॉप फोडला आहे. एवढेच नाहीतर या प्रवाशास एसटीतून खाली उतरवून एसटी घेऊन गेला आहे. हा प्रकार २६ जानेवारीला सव्वाअकरा वाजता घडला आहे.

यात आवाटी येथील उबेद राजू खान या विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी आकुर्डी येथे पॉलिटेक्नीक कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. सुट्टी असल्याने गावाकडे आलो होतो. कॉलेजला जाण्यासाठी २६ जानेवारीला सकाळी दहा वाजता परांडा डेपोच्या परांडा – पुणे या बसमध्ये बसलो होतो. त्यावेळी तिकीटाची रक्कम वाहक विजय बाबू वाघमारे यांना विचारले असता त्यांनी रूपये ३७३ सांगितली. माझ्याकडे पैसे सुट्टे नसल्याने त्यांना ५०० रूपये दिले. पुढे वीट येथे आल्यानंतर राहिलेले शिल्लक १२७ रूपये मागितले.

त्यावेळी वाहक विजय वाघमारे यांनी शिव्या देऊन तुला समजत नाही का.. असे म्हणून माझ्या साहित्याची बॅग बस मधून खाली फेकून दिली. त्या बॅगमधील माझ्या लॅपटॉपचे नुकसान झाले आहे. तसेच मला खाली उतरवून निघून गेला. त्यानंतर मी व माझे वडील खाजगी गाडीने भिगवण डेपोत गेलो असता, तेथील डेपो मॅनेजरला ही तक्रार सांगितली. त्यावेळी डेपो मॅनेजरने माझे १२७ रूपये परत दिले… या प्रकरणी पोलीसांनी वाहकाच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर हे करत आहेत.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!