दहिगाव सिंचन योजने मधील सर्व दहा पंप सुरु - पूर्ण क्षमतेने ही योजना चालविणार : आमदार नारायण पाटील - Saptahik Sandesh

दहिगाव सिंचन योजने मधील सर्व दहा पंप सुरु – पूर्ण क्षमतेने ही योजना चालविणार : आमदार नारायण पाटील

करमाळा (दि.२९): दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरु असून, पाणी उपसा चालू आहे. या आवर्तना पूर्वी या योजनेतील पंप हाऊस एक (दहिगाव) येथील सहा पैकी दोन पंप बंद होते तर पंप हाऊस दोन (कुंभेज) येथील चार पैकी एक पंप नादुरुस्त होता, यामुळे हीं योजना सरासरी 65% क्षमतेने पाणी उपसा करीत होती. याबाबत आमदार नारायण पाटील यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या यांत्रिकी इलेक्ट्रिक व स्थापत्या विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला यामधील अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना मोटारी तात्काळ दुरुस्त करण्याची सूचना दिली.

यावर युद्ध पातळीवर काम होऊन सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या सर्व म्हणजे दहा मोटरी सुरु झाल्या आहेत यावर आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की,दहिगाव सिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करुण पंचवीस हजर एकर क्षेत्र ओलीताखाली आणून तांत्रिक दृष्ट्या असलेल्या त्रुटी दुर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जातील.वाढीव चऱ्या अंशतहा गावे व नवीन भाग यांचा समावेश करुण तालुक्याच्या हक्काचे 1.81 TMC लाभ क्षेत्रात उपलब्ध करुन देण्याचं आपल उदिष्ठ राहील केवळ सर्व पंप चालू नसल्याने पाणी राखीव असूनही ते उचलले जाऊ शकत नव्हते.यामुळेच योजना पूर्ण क्षमतेने कायम स्वरूपी चालू ठेवा असे आदेश दिले आहेत.

दहिगाव उपसा सिंचन योजनेवर आपण स्वतःहा बारकाईने लक्ष ठेऊन असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटीबद्द असल्याचे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. या योजनेचे सर्वच्या सर्व दहा पंप कार्यनवीत झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढला असून लाभ क्षेत्रात एकाच वेळेस तीन ठिकाणी पाणी दिले जात आहे.शेतकरी वर्गातून आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यतत्पर्यतेच कौतुक होत आहे.या कामासाठी उपविभागीय अधिकारी संजय राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली,कनिष्ठ अभियंता श्रीधर आवटे व सर्व अधिकारी कार्मचारी वर्ग योग्य नियोजन आमलात आणत आहेत.

सुलेखन-प्रशांत खोलासे, केडगाव ता.करमाळा (मो. 9881145383)
Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!