रस्त्याच्या कारणावरून तिघाजणाकडून वृध्द महिलेस मारहाण
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : रस्त्याच्या कारणावरून तिघाजणांनी वृध्द महिलेस मारहाण केली आहे. हा प्रकार रावगाव (ता. करमाळा) येथे १२ सप्टेंबरला सायंकाळी चार वाजता घडला आहे. या प्रकरणी पद्मीनी रामकृष्ण बुधवंत (वय ६०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात तिने म्हटले आहे, की १२ सप्टेंबरला मी माझ्या शेतात जात असताना रस्त्यावर आजिनाथ गोरख केकान, शुभम आजिनाथ केकान, रतन आजिनाथ केकान या तिघांनी शिवीगाळ करून हाताने, लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करून जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.