घोटी येथील अथलेटिक्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड... - Saptahik Sandesh

घोटी येथील अथलेटिक्स अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : घोटी (ता.करमाळा) येथील आर्या फिजिकल आणि अथलेटिक्स अकॅडेमी विद्यार्थ्यांची ११ सप्टेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत चांगले यश मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेत दिल्ली येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यामध्ये ईशायू क्षीरसागर उंच उडीमध्ये प्रथम आणि 400 मीटर धावण्यात द्वितीय, ओमराज कांबळे 400 मीटर आणि 2000 मीटरमध्ये धावणे प्रथम, प्रितल गांधी लांब उडी पहिली आणि 800 मीटर धावणे प्रथम, सिद्धार्थ मंजुळे 100 मीटर 200 मीटर प्रथम क्रमांक, प्रगती देशमुख 100 मीटर धावणे प्रथम, तुषार भोगे 100मी द्वितीय क्रमांक, 400 मी अडथळा आणि 5000 मी चालणे प्रथम क्रमांक, वैष्णवी मोरे 5000 मी चालणे प्रथम क्रमांक, प्रिती जाधव 5000 मी चालणे द्वितीय क्रमांक मिळविला या सर्व खेळाडूंना आर्या फिजिकल आणि अथेलॅटिक्स, अकॅडेमीचे अंकुश थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!